तीन दिवसात पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करा ; कृषी अधिकारी गिरी यांचे आदेश

d98f76ef93177210c841e6ae386a4342

 

खामगाव (प्रतिनिधी) खामगाव (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे खामगाव तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार पुढील तीन दिवसात पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश खामगाव तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी दिले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी शेतक-यांनी सुविधा केंद्रावर संपर्क साधावा, असे देखील त्यांनी कळविले आहे.

 

या नुकसानाचे पंचनामे कृषी, महसूल व पंचायत समिती या विभागाचे संयुक्त पथक करणार आहे. याबाबत या विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची संयुक्त बैठक 30 ऑक्टोंबर रोजी तालुका कृषी अधिकारी,गणेश गिरी यांनी घेतली. या बैठकीत सर्व संबंधितांना तीन दिवसात पंचनामे करुन पूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकारी, गिरी यांनी दिले. सर्व्हेक्षणाचे काम सुरु झाल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी या बैठकीत दिली.

 

कृषी अधिकारी कार्यालयात पिकविमा काढलेल्या शेतक-यांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहेृ. त्यात विमा कंपनीला तक्रारी हे मेल करण्यासाढी सुविधा उपलब्ध आहे. या बेठकीला गटविकास अधिकारी, चरणसिंग राजपुत, नायब तहसिलदार, विजय चव्हाण, महसुल, कृषी व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शेतक-यांच्या बांधावर जाऊन सर्वे करुन त्याचा अहवाल 3 दिवसात सादर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. ज्यांनी पिकविमा भरला आहे त्यांचे जिओ टॅगींग नुसार छायाचित्र घेऊन पंचनामे करण्यात येतील. ज्यांना पिकविमा काढला नसेल त्यांच्या नुकसानाचे देखिल पंचनामे करण्यात येणार आहेत.

 

पिक विमा भरलेल्या शेतक-यांनी सुचना फॉर्म सोबत पिक विमा भरल्याची पावती, 7 / 12, बँक पासबुकची झेरॉक्स ईत्यादी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी, खामगांव कार्यालयात विमा सुविधा केंद्रावर स्विकारले जाणार आहेत. तेव्हा, शेतक-यांनी सुविधा केंद्रांवर संपर्क साधावा, असे आवाहन खामगाव तालुका कृषी अधिकारी, गणेश गिरी यांनी केले आहे.

Protected Content