नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताचा प्रतिभावान खेळाडू व सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा पाकिस्तानवर तोफ डागली आहे. भारतात हिंदू मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कोरियनवर झालेल्या भेदभावाबद्दल गंभीर म्हणाला की, भेदभाव करणे हाच पाकिस्तानचा खरा चेहरा असून भारताने तर मोहम्मद अझरूद्दीन याला ही कर्णधार केले होते.
कोणतेही काम करताना कायम काम करणाऱ्याची गुणवत्ता पाहिली जाते. क्रिकेटमध्येही मोठे नाव असून चालत नाही, तर प्रतिभावंत खेळाडू असणं महत्त्वाचं असतं. सगळेच क्रिकेट संघ प्रतिभावंत खेळाडूंना संधी देतात, पण पाकिस्तानच्या दानिश कनेरियाला हिंदू असल्याने संघात त्रास दिला जात होता असा गौप्यस्फोट रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने केला. या मुद्द्यावर बोलताना भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. हाच पाकिस्तानचा खरा चेहरा आहे. तर दुसरीकडे भारतासारख्या देशात मुस्लीम जनता अल्पसंख्याक असतानाही मोहम्मद अझरूद्दीन दीर्घकाळ भारतीय संघाचा कर्णधार होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे स्वत: एक खेळाडू होते. त्यांच्या देशात अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर हे अतिशय लज्जास्पद आहे, अशी टीका गौतम गंभीर याने केली आहे.