आम्हाला पंकजा मुंडे यांची चिंता : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे यांना एकटे पाडण्याचा कट रचण्यात आला असून आम्हाला याची चिंता वाटत असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

काल राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तिसरा उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीला आणि विशेष करून शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. यावर कालच संजय राऊत यांनी काही अपक्षांनी गद्दारी केल्याचा आरोप केला होता. यानंतर आपल्या रोखठोक या सदरात त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरील अन्यायाबाबत भाष्य केले आहे. तसेच आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.

 

या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, आम्हाला मुंडे कुटुंबाची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे संबंध जिव्हाळ्याचे होते. पण त्या कुटुंबाबत काही घडत असेल तर आम्हाला चिंता वाटणारच. राजकारण राजकारणाच्या तागडीत. ते तुमचं तुम्ही बघा. पण पंकजा मुंडे असेल, प्रीतम असेल यांचं ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. युती टिकवण्यात वाढवण्यात मुंडे साहेबांची मोठी भूमिका होती असे ते म्हणाले. तर भाजपमध्ये फडणवीस यांना स्वत:चा गट उभा करायचा असल्याची टीका देखील त्यांनी केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!