नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत तरुणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिलेला टास्क पूर्ण केल्यास त्या बदल्यात अधिक नफा देण्याचे अमिष दाखवत शोयब खान रऊफ खान (वय- ३७, रा. खडका रोड, भुसावळ) या तरुणाची यांची ६ लाख ९१ हजार ७८ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. यामध्ये खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नी यांच्या खात्यावरूनही रक्कम काढली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संबंधित आयडी युजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत माहिती अशी की, भुसावळ येथील व्यापारी शोयब खान यांच्याशी १७ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान एकाने संपर्क साधत सोशल मीडियावर लिंक पाठवून टास्क दिला. तो पूर्ण केल्यास त्या बदल्यात अधिक नफा देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. त्या दरम्यान खान यांच्यासह त्यांच्या आई व पत्नीच्या बँक खात्यातून संबंधिताने वेळोवेळी एकूण ६ लाख ९१ हजार ७८ रुपये काढले.

त्या बदल्यात नफा तर दूरच हातची रक्कम गेली व कोणताच मोबदला मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि खान यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करत आहेत.

Protected Content