Home Cities अमळनेर अमळनेरातील कोर्ट परिसरातील पाण्याची टाकी अखेर गाळमुक्त

अमळनेरातील कोर्ट परिसरातील पाण्याची टाकी अखेर गाळमुक्त

0
11


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची समस्या अखेर दूर करण्यात आली आहे. कोर्ट परिसरातील पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्णपणे काढण्यात आला असून, तब्बल २२ ते २४ वर्षांपासून स्वच्छता न झाल्याचा दावा करण्यात आलेली ही टाकी आता गाळमुक्त झाली आहे.

अमळनेर शहरातील पाणीपुरवठ्याची पाहणी करताना उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतः पाण्याच्या टाकीत उतरून प्रत्यक्ष तपासणी केली होती. यावेळी कोर्ट परिसरातील टाकीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. सदर पाण्याची टाकी अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याचा दावा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केला होता. या टाकीची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाण्याच्या टाकीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. टाकीतील साचलेला गाळ काढून पाणीपुरवठा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

पाणीपुरवठ्याशी संबंधित नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दीर्घकाळ प्रलंबित असलेली टाकी स्वच्छतेची समस्या मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी स्वतः पुढाकार घेत केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारे पाणी साठवण टाक्यांची नियमित तपासणी व स्वच्छता करण्याची गरज व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound