अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे ५२ लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या सदर नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. आमदारांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा मांडला.
या प्रसंगी बाजार समिती संचालक समाधान धनगर, बाजार समिती माजी संचालक जे.के.पाटील, बाळू आप्पा हिंगोणेकर, गजेंद्र माधवराव पाटील अंबारे, सरपंच अंबारे सुनील मन्साराम पाटील, सरपंच करणखेडा सौ.कविता महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ.अलकाबाई गुलाब धनगर, पोलिस पाटील शांताबाई लक्ष्मण पाटील, वि.का.स. सोसायटी चेअरमन विश्वास विनायक पाटील, माजी सरपंच सुधाकर यशवंत पाटील, लक्ष्मण झुलाल पाटील, गुलाब धनगर, यशवंत पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, सुरेश धनगर, अनिल बागुल, निशिकांत सूर्यवंशी, माजी सरपंच लोटन शिवदास पाटील, ग्रां.पं.सदस्य गणेश गुरव, ग्रां.पं.सदस्य महेंद्र पाटील, दिलीप पाटील, पंकज धनगर, गजानन कोळी, राकेश धनगर, विजय भील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील, बाळू पाटील, राजेंद्र पाटील, विजया राजेंद्र पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी भूमिपुजन केलेल्या कामांमध्ये नाविन्यापुर्ण योजने अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम १० लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत समाजमंदिर बांधकाम १० लक्ष, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण ५ लक्ष, जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे ५२ लक्ष असे एकूण रक्कम ७४ लक्ष रूपयांच्या कामांचा समावेश आहे.