वसंतवाडी येथील महावितरण सबस्टेशनमध्ये तोडफोड; नऊ जणांवर गुन्हा

wasanto wadi

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे डी.पी. बंद असल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. याचा राग आल्याने गावातील 9 जणांनी वसंततवाडी येथील महावितरणच्या सबस्टेशनच्या अधिकार्‍याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केल्याची घटना सेामवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील राजेंद्र रमेश महाजन हे महावितरणमध्ये वरिष्ठ यंत्र चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सद्यस्थितीत जळके, वसंतवाडी येथील सबस्टेशनवर कार्यरत आहेत. 16 रोजी वीज चोरी प्रतिबंधक कारवाईसाठी सबस्टेशनचे इंजिनियर अमिल सुलक्षणे, विद्युत सहाय्क विजय साळवे, संदीप गुंजकर, किशोर पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक बारी, अमोल भगत, अमोल पाटील, दिनेश पाटल हे वसंतवाडी येथे गेले होते. पुन्हा सबस्टेशनवर परत आल्यानंतर अमिल सुलक्षणे हे अधिकृत वीज वापरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी डी.पी.सुरु करायला गेले असता याठिकाणी वसंतवाडी येथील नागरिकांनी डी.पी सुरु करण्यात विरोधत करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी डी.पी.सुरु करायला गेले असता सबस्टेशनमध्ये संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण, गोपाळ बापू राठोड, निलेश पंडीत चव्हाण, ज्ञानेश्‍वर शिवा चव्हाण, सुपडू मोरसिंग चव्हाण, बसराज गणपत राठोड, विजय सिताराम चव्हाण, विक्रम भिका चव्हाण सर्व रा. वसंतवाडी तांडा यांनी तांड्यावरील वीजपुरवठा सुरु करणारे तार काढून सर्विस वायर टाकून इतरांना वीजपुरवठा कसा दिला, असे म्हणत शिवीगाळ करत तसेच मारहाण करण्याची धमकी देत कार्यालयात प्रवेश केला. तसेच 4 खुर्च्यांची तोडफोड करत नुकसान केले. कार्यालयातील फाईल, कागदपत्रे फेकून त्यातील काही फाडून नुकसान केले. याप्रकरणी वरिष्ठ यंत्रचालक राजेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नऊ जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content