जळगाव, प्रतिनिधी | केंद्रातील सध्याचे सरकार हे लोकांच्या मतांवर निवडून आलेले नसून ते ईव्हीएम सरकार आहे. या ईव्हीएम सरकारनं केलेली चोरी उघड झाली आहे. त्या विरोधात आता देशभरातील जन संघटना रस्त्यावर असल्याची माहिती राष्ट्रीय जनआंदोलनाचे निमंत्रक रवी भिलाणे व फिरोझ मिठीबोरवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी इसुफ परमार, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे ज्योती बढे आदी उपस्थित होते.
भिलाणी यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजांविरुद्धच्या ‘भारत छोडो’ चळवळीच्या धर्तीवर देशभरात ‘ईव्हीएम भारत छोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे. ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने या महाराष्ट्र यात्रेला मुंबई येथून सुरुवात झाली असून यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे चैत्यभूमी येथे करण्यात येणार आहे. येणाऱ्या निवडणुका सुद्धा लोकशाहीसाठी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुका ईव्हीएम मुळे जिंकले हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर लढून दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी भाजपा सरकारला दिले. यावेळी विनोद देशमुख हरिश्चंद्र सोनवणे खुशाल चव्हाण अश्फाक पिंजारी पटेल दिलीप सपकाळे ईश्वर मोरे जाधव मिलिंद सोनवणे राजू भोळे प्रा. पवार उपस्थित होते. अखिल भारतीय इव्हीएम विरोधी जन आंदोलनाचा २३ ऑगस्ट रोजी मुंबई चैत्यभूमी येथून सुरुवात झाली असून या यात्रेची सांगता ३१ ऑगस्ट रोजी चैत्यभूमी येथेच करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज विविध सामाजिक संघटनांची पक्षांची बैठक घेण्यात आली. बैठकीत विरोधी आंदोलनास मोठे स्वरूप देण्याचे निश्चित करण्यात आले. हा दौरा ९ दिवसांचा असणार असून नाशिक मालेगाव, कडगाव , जालना, सिंदखेडा, मनमाड या भागात आंदोलन करण्यात येणार आहे. ईव्हीएमद्वारे लोकसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला आहे. या निवडणुकीत 20 लाख ईव्हीएम गहाळ झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी प्रतिभा शिंदे यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री यांनी बलेट पेपरचा खर्च अधिक असतो हे म्हणणे चुकीचे असून त्यात तथ्य नसल्याचे मत मांडले. मुख्यमंत्री यांचे व्यक्तव्य हे संविधानाच्या विरोधात असून आम्ही याचा निषेध करतो असे सांगितले.