जळगाव प्रतिनिधी । गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघुर धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे वाघुर नदीला पुर आला आहे. नदीवरील पुलावरून पुराचे पाणी ओसंडून वाहत असल्याने नशिराबाद आणि सुनसगाव या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
दोन दिवसांच्या पावसाच्या शांततेनंतर शुक्रवारी रात्रभर पावसाचे हजेरी लावली. त्यामुळे संततधार पावसामुळे वाघुर धरण पुर्णपणे भरले आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाण्यामुळे जिल्ह्यातील सर्व नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. वाघूर धरणावरील 20 दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आला असून धरणावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वाघूर नदीला पुर आला आहे.दरम्यान या नदीवर नशिराबाद आणि सुनसगाव या दोन्ही गावांना जोडणार पुलावरून पाणी आसंडून वाहत असल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. सुनसगाव वाघुर नदीला महापूराचे स्वरूप पुरात येथील बाळू धुडकू धनगर यांच्या दोन म्हशी वाहून गेल्या होत्या परंतु जिवंत सापडल्या आहेत.