वाघूरचे आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

andolan jagaong

जळगाव प्रतिनिधी । वाघुर धरणातुन उजव्या व डाव्या कालव्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत प्रशासनाची कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. याबाबत जिल्हा प्रशासनास मागणीचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळी कापूस लागवडीसाठी दरवर्षा प्रमाणे आम्ही लाभधारक सिंचन समितीने पाण्याची मागणी केली, वाघूर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्य आहे असे सांगितले परंतु त्यासंदर्भात लाभसिंचन समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी घेणार आहे असे सांगण्यात आले. त्यानुसार २० मे २०१९ रोजी शेतकऱ्यांसह समितीचे सदस्य भेटल्यानंतर वाघुर धरण विभागाकडून पाणी साठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

२७ मे २०१९ रोजी आम्ही समिती सदस्य पुन्हा भेटल्यावर वाघर धरण विभागाकडून पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी  पाणी सोडणे शक्य आहे. असा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे असे सांगितले, परंतु कृषी अधिकाऱ्‍यांच्या मते ३१ मे च्या अगोदर कापुस लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे आपण मे ऐवजी १ ते ७ जून दरम्यान आवर्तन सोडू असे सांगण्यात आले होते मात्र वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी मागणी करून पाण्याचे आवर्तन सोडत नसल्याने आज निषेधार्थ शेतकऱ्यांसह समिती सदस्यांनी एक दिवसीय आंदोलन केले.

Protected Content