अमळनेर येथे स्पार्क फाउंडेशनतर्फे शनिवारी विविध कार्यक्रम

images 2

अमळनेर (प्रतिनिधी) येथील स्पार्क मल्टिपर्पज फाउंडेशनतर्फे १५ जून रोजी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वही वाटपासह ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात वर्षभरापूर्वी ‘स्पार्क’ ने पदार्पण करून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आता ‘स्पार्क’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नगरपालिका शाळा नंबर १ येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात संस्थेतर्फे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वहीवाटप होणार आहे. तर सामाजिक सलोखा वाढवीण्यासाठी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास आ. शिरिषदादा चौधरी, आ.सौ.स्मिताताई वाघ, नगराध्यक्षा सौ.पुष्पलताताई पाटील हे विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा अहिरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, तहसीलदार श्रीमती ज्योतीताई देवरे, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, मुख्याधिकारी श्रीमती शोभाताई बाविस्कर, मंगळग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी व पदाधिकारी, रियाज काजी, मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, रॉयल उर्दू स्कुल, रणजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज दुसाने, उपाध्यक्ष डॉ. हर्षल दाभाडे, सचिव प्रशांत जगदाळे यांनी केले आहे.

Protected Content