प. वि. पाटील विद्यालयात पतंग महोत्सव

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे मकरसंक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शाळेत बोलाविण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी छान छान पतंग बनवून त्यावर माझे  कुटुंब माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, घरात राहू सुरक्षित राहू, नियम पाळा कोरोना टाळा, हात जोडून नमस्कार, हाच खरा शिष्टाचार असे संदेश लिहिले. एकमेकांना तिळगुळ देऊन विद्यार्थ्यांनी तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या घरी राहून पतंग उडविण्याचा आनंद आपल्या कुटुंबीयांसोबत घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील तसेच खुशबू चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी सहकार्य केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!