पाचोऱ्यातील व्ही.टी.जोशी यांची जळगांव जिल्हा शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड

पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्हा शैक्षणिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, नगरपालिकाचे गटनेते तथा चेअरमन पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, संचालक प्रकाश एकनाथ पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश चौधरी, सुनील पाटील, प्रकाश निकुंभ, प्राचार्य वासुदेव वले, संजय सूर्यवंशी यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content