मतदानाचे काम कर्तव्य म्हणून करा : उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे

f2313f7c 4bdb 420b 9486 025f01fa80ce

अमळनेर (प्रतिनिधी) निवडणुकीचे काम कर्मचारी वर्गाने आपले कर्तव्य म्हणून प्रमाणिकपणे करावे. तर नागरिकांनी देखील मतदानाचे काम कर्तव्य म्हणून केले पाहिजे,असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी केले. त्या निवडणूक प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम बोलत होत्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचे छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम आज (गुरुवार) व उद्या (शुक्रवार)असा दोन दिवस घेण्यात येणार आहे. यावेळी श्रीमती अहिरे यांनी मतदान केंद्र अध्यक्ष,मतदार अधिकारी यांची कामे याबाबत मार्गदर्शन करून मतदान केंद्रावर व्हिव्हिपँट मशिन्सबाबत सविस्तर माहिती सांगितली. सध्या निवडणुकीत मशीन्स बाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे हा गैरसमज दूर करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शक आहे, हे प्रात्यक्षिक करुन मतदारामधील संशय दुर करून मतदान प्रकीया कर्मचारी वर्गाला समजावी यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी कँन्टोल युनिट, व्हि.व्हि पँट,बँलेट युनिट याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले. निवडणूक प्रक्रिया कर्मचारी वर्गाने समजून घ्यावी,असे आवाहन केले. तर निवडणूक प्रशिक्षणात गैरहजर असणाऱ्या कर्मचारी वर्गावर निवडणूक अधिनियम नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण वर्गात कर्मचाऱ्यांच्या निवडणूक बाबतीत समस्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा व निरसन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक,लिपिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

Add Comment

Protected Content