जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकांकडे पाहिले जाते. लोकशाहीत प्रत्येक नागरीकाने मतदान केले पाहिजे यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर अशासकीय व सामाजिक संस्थाही कार्य करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयाच्या स्थानिक ढाके कॉलनी सेवाकेंद्रात मतदान जागरूकता अभीयानाचे आयोजन करण्यात आले.
ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी यांनी याप्रसंगी लोकशाहीत मतदानाचे महत्व सर्वांना सांगितले. या अभियानासाठी मा. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हा आयकॉन म्हणून नियुक्त केलेल्या मदन लाठी यांनी उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन करुन शपथ दिली. ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू आणि संपूर्ण भारतात ब्रह्माकुमारीज् सदस्य हे मतदानात उत्साहाने सहभागी होतात असे प्रतिपादन याप्रंसगी ब्रह्माकुमारीज् जनसंपर्क अधिकारी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. याप्रसंगी ब्रह्माकुमारी बहिणींनी मतदान जागृतीसाठी विशेष रांगोळी काढून प्रबोधन केले