नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी दि. १० जून तर विधानसभेसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. यापाठोपाठ १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली. यात निवडणूक मतदान प्रक्रिया १८ जुलै रोजी घेण्यात येणार असून मतदानासाठी १,२ आणि ३ असा पसंतीक्रम देण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या मतदानासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य असे देशभरातून ४ हजार ८०९ आमदार आणि खासदार मतदान हक्क बजावणार आहेत. या मतदानानंतर २१ जुलै रोजी भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपतीची निवड होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.