बिहारमधील दुसर्‍या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले असून यासोबत ११ राज्यांमधील विधानसभेच्या ५४ जागांसाठीही आज निवडणूक होत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी आज एकूण १७ जिल्ह्यातील ९४ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण १४६३ उमेदवार जनतेचा कौल मागत आहेत. यात पूर्व चंपारण, पश्‍चिम चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, छपरा, वैशाली, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, नालंदा आणि पाटणा, या जिल्ह्यांत मतदान होत आहे.

यासोबत देशातील ११ राज्यांतही ५४ विधानसभा जागांवर पोट-निवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशातील सात विधानसभा जागांवर ८८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. येथे भाजपा, सपा, काँग्रेस आणि बसपाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. या शिवाय, मध्य प्रदेशातील २८, गुजरात मधील ८, कर्नाटक, ओडिशा, झारखंड आणि नगालँडमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगाणा, छत्तीसगज आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेसाठी पोट-निवडणूक होत आहे.

Protected Content