काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत : खा.असदुद्दीन ओवैसी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 10 13 at 4.13.14 PM

फैजपूर, प्रतिनिधी | महाराष्ट्रात भाजपा सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते तर मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही असा प्रश्न एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला. ते रावेर विधानसभा मतदारसंघातील एमआयएम पक्षाचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

भाजप मुस्लिमांवर अन्याय करत आहे असा आरोप खा.  असदुद्दीन ओवैसी यांनी केला. त्यांनी देशातील तसेच महाराष्ट्रातील भाजपा सरकारला टीकेची झोड उठवून यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत असा टोला त्यांनी यावेळी लगविला. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले.  खा. ओवैसी यांनी मतदारसंघातील स्थानिक मुद्द्यांना हात घालत केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतांना सुद्धा केळीला अद्याप पर्यंत फळाचा दर्जा नाही. मात्र द्राक्षाला फळाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे केळी उत्पादकांवर हा अन्याय नाही का ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.खा. ओवैसी पुढे सांगितले की, मध्यप्रदेश सरकार अवकाळी व वादळी वाऱ्यामुळे केळीचे नुकसान झाल्यास हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देते. तर महाराष्ट्रात केवळ हेक्टरी १८ हजार रुपये मिळता ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का ? मधुकर कारखान्यातील कामगावर व शेतकरी यांची देणी अद्याप दिलेली नसतांना काँग्रेस नेते निवडणूक रिंगणात कसे असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. यावेळी खा. ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टिका केली. यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, तिहेरी तलाक विधयक, जीएसटी, नोट बंदी याच्यावरही टीका करत नोट बंदी व जीएसटी यांनी देशाची वाट लावत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी उमेदवार विवेक ठाकरे हे ठेवीदारांच्या समस्या सोडवून न्याय देण्याच काम करीत असल्याचे विवेक ठाकरे यांचे कौतुक केले.

Protected Content