भारताचा विकासदर घटण्याचा जागतिक बँकेचा अंदाज

world bank

नवी दिल्ली प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता जागतिक बँकेनंही भारताचा जीडीपी कमी केला आहे. जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष 2019-20 च्या जीडीपीचा अंदाज 0.9 टक्क्यांनी कमी करून 6 टक्के केला आहे. असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे.

आयएमएफने याच आठवड्यात भारताचा या वर्षाचा आर्थिक विकासदर घसरणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आयएमएफने ०.३० टक्क्यांनी घटवून विकासदर आता ७ टक्के इतका वर्तवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदर ६.८ टक्क्यांवरून घसरून ६.१ टक्के इतका अंदाज वर्तवला आहे. देशांतर्गत मागणीत घट झाल्याने आर्थव्यवस्थेला मरगळ आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी हा अंदाज आला आहे. २०१७-१८मध्ये विकासदर ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. हा विकासदर २०१८-१९मध्ये ६.८ टक्क्यांपर्यंत घसरला. आता त्यात आणखी घसरण होऊन विकासदर केवळ ६ टक्के होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात औद्योगिक उत्पादनाच्या विकासदरात वाढ झाली आहे. औद्योगिक उत्पादन आणि रियल इस्टेट क्षेत्राचा विकासदर ६.९ टक्क्यांवर गेला आहे. तर कृषी विकासदर २.९ टक्के आणि सेवा क्षेत्राचा विकासदर ७.५ टक्के राहील, असा अंदाज वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात वर्तवला आहे.

Protected Content