विविध मागण्यांसाठी अल्पसंख्याक सेवा संघाचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडिओ)

 

जळगाव प्रतिनिधी । जात पडताळणी कार्यालयात छप्पर बंद समाजाच्या विद्यार्थ्यांसह पालकांची फिरवा फिरव केले जात असल्याचा आरोप करत अल्पसंख्यांक सेवा संघाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील जात पडताळणी कार्यालयामार्फत व्हीजेएनटी छप्परबंद समाजाच्या पालकांची व विद्यार्थ्यांची फिरवाफिरव केली जात आहे. अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र एकाही विद्यार्थ्याला देण्यात आलेले नाही. ही गंभीर बाब आहे. दरम्यान व्हीजेएनटी नीटची परीक्षा झाले, नीटचा निकाल आला, पण विद्यार्थी व पालक जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहे. इतर प्रवर्गातील आणि समाजातील विद्यार्थ्यांच्या रक्त नात्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. तसेच त्यांच्या रक्ताच्या नात्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे. परंतु विजेएनटी छप्परबंद समाजाच्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत चांगले गुण मिळवूनही प्रमाणपत्र अभावी प्रवेश होत नाही. ही गंभीर बाब असून तातडीने विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. रक्तातील नात्यातील वैधता प्रमाणपत्राच्या झेरॉक्स लावूनही जात समिती दाखले देत नाही, याची चौकशी करून प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात यावे, अन्यथा अल्पसंख्यांक सेवा संघटना आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलेला आहे.

या निवेदनावर अल्पसंख्यांक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, उपाध्यक्ष याकुब खान, जिल्हा महिला अध्यक्ष आशियाबी मणियार युवा जिल्हाध्यक्ष आदिल शहा शकील शहा, डॉ. अनिष शहा, आसिफ शहा हानिफ शहा, गुलाब शहा कादर शहा, तालुकाध्यक्ष गुलाब मिर्झा यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3072816176295332

Protected Content