जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागातर्फे शहरातील विवेकांनद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहा दिवसीय मोफत योग शिबीराचे उद्घाटन शाळेचे समन्वयक गणेश लोखंडे यांच्याहस्ते आज सोमवारी सकाळी 7 वाजता करण्यात आले.
सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांतर्गत निलेश वाघ, जितेंद्र कोतवाल, जागृती ठाकरे आणि अपर्णा राणी यांनी वाघ नगर येथील विवेकांनद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पाचवीच्या 120 विद्यार्थ्यांना थोडक्यात योगाविषयी माहिती व मार्गदर्शन केले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 23 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2019 दरम्यान दररोज सकाळी 7 ते 7.30 दरम्यान योगाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ओमकार, शांतीपाठ, गुरूवंदना, पुरक हालचाली, ध्यानात्मक आसने घेण्यात आले. आयोजित केलेल्या शिबीरासाठी सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाचे प्राचार्या आरती गोरे, प्रा. देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे, गितांजली भंगाळे, ज्योती वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.