फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात दरतीन वर्षांनी भव्य नामसंकीर्तन सप्ताह होत असतो. यावर्षी 9 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत भव्य सामूहिक विठ्ठल नामजप व नाम संकीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सुमारे 4 ते 5 एकर क्षेत्रात होणार असून या भव्य मंडप उभारणी साठी आज भूमी पूजन गणेश वसंत पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी खंडोबा मंदिरात पूजा हार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजनबाबत नरेंद्र विष्णू नारखेडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समिती अध्यक्ष चोलदास पाटील, सि.के.चौधरी, नरेंद्र चौधरी, विजय कुमार परदेशी, अनिल नारखेडे, शेखर चौधरी, निळकंठ सराफ, गोटू भारंबे, डॉ.उमेश चौधरी, गणेश भारंबे, नितीन महाजन, राजाराम महाजन, काशिनाथ वारके, भूषण नारखेडे, प्रवीण महाराज, माजी नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र साळी, कमलाकर भंगाळे, देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, तुकाराम बोरोले, प्रकाश चौधरी, राजू महाजन, किरण चौधरी, अमोल बाक्षे, पप्पू चौधरी, बबलू महाजन, दीपक होले, जितू भारंबे, सिद्धेश्वर वाघूळदे, नरेंद्र महाजन यांचे सह समितीचे कार्यकर्ते व गावातील पदधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवात दररोज सकाळी सामुहिक नामजप दुपारी 3 ते 5 कथा रात्री 8 त 10 महाराष्ट्र प्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तने होतील. भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजन समितीने केली आहे.