इंटरनेट सेवा व टेलिव्हीजन चॅनल्सच्या दरात कपात करा – समता सैनिक दलाची मागणी(व्हिडिओ)

चाळीसगाव, प्रतिनिधी | इंटरनेट सेवा व टेलिव्हीजन चॅनल्सच्या दरात कपात करण्यात यावे तसेच या क्षेत्रातील खाजगी उद्योगांवर अंकुश ठेवण्याची मागणी समता सैनिक दलातर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

समता सैनिक दलाच्या निवेदनाचा आशय असा की, देशात प्राथमिक शिक्षणापासून ते सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार डिजिटल व्हावे, ऑनलाईन व्हावे. यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा असे ही आवाहन केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. त्यास देशातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. देशातील करोडो लोक ऑनलाईन व्यवहार करीत आहेत.यातून इंटरनेट सेवेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अवाजवी आणि राक्षसी नफा कमविण्याच्या कु-हेतुने इंटरनेट सेवा पुरविणान्या जिओ, आयडिया, एअरटेल या खाजगी कंपन्यांनी १डिसेंबर २०२१ पासून एकदम २० टक्केपेक्षा जास्तीची दरवाढ केली आहे. अशाच प्रकारची राक्षसी दरवाढ घराघरात वापरल्या जाणाऱ्या टेलिव्हीजनच्या नेटवर्क दरात देखील करण्यात आली आहे. तीन वर्षापुर्वी महिना रु.१०० चा खर्च आता ४०० ते ५०० रुपये झाला आहे. आम्ही या दरवाढीचा तीव्र निषेध करतो. ही दरवाढ मागे न घेतल्यास त्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, भाईदास गोलाईत, स्वनिल जाधव, राजरत्न मोरे, रणजीत राठोड,बा. का. पगारे, ज्ञानेश्वर बागुल, उमेश पवार, मिलींद भालेराव, नितीन मरसाळे, निवृत्ती बागुल, किरण महाले, ज्ञानेश्वर अहिरे, निखील घोडेस्वार, सुनील महाले, अशोक सोनवणे, वैभव महाले, राकेश सोनवणे, बापू सोनवणे, विलास निकम, नाना गायकवाड, घनश्याम बागुल, नेहा राठोड, प्रेरणा खैरे, प्रियंका बागुल, प्रकाश सोनवणे, जीवन जाधव आदीच्या स्वाक्षरी आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/609799980078935

 

Protected Content