जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘इनरव्हील डे’च्या निमित्ताने जळगावच्या इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सावखेडा शिवारातील मातोश्री आनंदा आश्रमाला भेट देत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष उषा जैन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, प्रोजेक्ट चेअरमन नूतन कक्कड आणि इतर सदस्य सहभागी झाले होते. या वेळी नूतन कक्कड यांनी भोजन व्यवस्था केली, आणि सर्व सदस्यांनी आजी-आजोबांसोबत भोजनाचा आनंद घेतला.
क्लब सदस्यांनी आश्रमाला एक महिना पुरेल इतके किराणा साहित्य प्रदान केले. या उपक्रमासाठी नूतन कक्कड आणि त्यांच्या कुटुंबीयांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. या कार्यात तृप्ती चौबे, तनुजा मोरे, मेघना जीवराजानी, ज्योस्ना रायसोनी, प्राजक्ता वैद्य, लीला अग्रवाल, साधना गांधी, सुनीता जैन, मीना लुनिया, डॉ. रितु कोगटा, रोहिणी मोरे, नीता जैन, राजश्री पगारिया, आणि संध्या महाजन यांचा समावेश होता. समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या या सेवाभावी उपक्रमामुळे इनरव्हील क्लबच्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.