वरणगावला श्री संत सावता महाराज यांचे 16 वे वंशज वासेकर यांची भेट

वरणगाव प्रतिनिधी । माळी समाजाचे आराध्य दैवत श्री संत सावता माळी यांचे 16 वे वंशज हभप रमेश माळी-वासेकर यांनी शनिवारी सायंकाळी वरणगाव येथील श्री संत सावता महाराज समाज मंदिराला भेट दिली. सर्व समाज बांधवानी एकत्र संघटीत राहून काम करावे असे मोलाचे आवाहन त्यांनी समाज बांधवाना  यावेळी केले.

माळी समाजाचे आराध्य दैवत असलेले संत सावता महाराज यांची समाधी स्थळ आरण भेंडी येथे आहे. त्या समाधीची सेवा करणारे आजचे 16 वे वंशज असलेले हभप रमेश माळी-वासेकर  हे आहेत. रमेश माळीवासेकर यांचा माळी समाज पंच कमेटीतर्फे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला.  त्यांनी वरणगावातील माळी समाजाची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

माळी समाज अध्यक्ष संजय माळी, पंच विश्व्नाथ माळी,   संतोष माळी, जगन्नाथ माळी, दगडू माळी, रामदास माळी, भगवान माळी, सेक्रेटरी नाना माळी, सुभाष माळी, निवृत्ती माळी, रमेश माळी, गणेश माळी, काशिनाथ माळी, मधुकर माळी यांनी रमेश महाराज यांचा सत्कार केला.

यावेळी माळी महासंघांचे वरणगाव शहराध्यक्ष सचिन माळी, युवा संघटनेचे अध्यक्ष दिपक माळी, उपाध्यक्ष बाळा माळी, किरण माळी, विशाल माळी, विकास माळी टिनू माळी, भैय्या माळी, लल्ला माळी, गंभीर माळी, प्रशांत माळी, अतुल माळी, बापू माळी, अक्षय माळी, राजाराम माळी, निखिल माळी, विशाल माळी, विलास माळी, प्रवीण माळी यांच्यासह माळी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्याने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाज बांधवानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच संतोष माळी यांनी केले. तर आभार अध्यक्ष संजय माळी यांनी मानले.

Protected Content