गोदावरी अभियांत्रिकी यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच औद्योगिक वसाहतीतील उद्योग व्यवसायांना औद्योगिक सहल उपक्रमांतर्गत भेट देत माहिती जाणून घेतली

गोदावरी अभियांत्रिकी यंत्रशाखेच्या विद्यार्थ्यांनी जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या किरण मशीन टुल्स, आ.जे.फुड प्रोडक्ट्स आणि के.एस.कोल्डस्टोरेज या विविध कंपन्यांना भेट दिली.
या अनेकविध औद्योगिक कंपन्यांमधील वेगवेगळ्या उत्पादनांसाठी चालणाऱ्या कार्यप्रणालीचे अगदी जवळून निरीक्षण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपकरणाची तसेच कार्याची माहिती घेता आली. औद्योगिक परिसरातील किरण मशीन टुल्समध्ये वेगवेगळ्या साईजच्या स्प्रिंगचे उत्पादन होते. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागांची व प्रोसेस जसे हिट ट्रिटमेंट, क्‍वॉलिटी चेकिंग, पॅकेजिंग व इतर बाबींची माहिती घेतली. तसेच आर.जे.फुड प्रोडक्ट्समध्ये विविध प्रकारच्या बिस्कीट जसे की पार्ले जी चे उत्पादन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रोसेसची सुरुवात व त्याचे पूर्ण प्रोडक्ट्समध्ये रुपांतर या सर्व बाबींचा अभ्यास व निरीक्षण केले. के.एस.कोल्डस्टोरेज मध्ये शीतगृहाच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करतांना रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग च्या प्रात्याक्षिकाचे माहिती विद्यार्थ्यांनी घेतले.

या औद्योगिक भेटीसाठी किरण मशिन टुल्सचे एचआर दिनेश भंगाळे, आर.जे.फुड् प्रोडक्ट्सचे आरआरओ योगेश पाटील, के एस कोल्ड स्टोरेजचे किशोर जैन यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या यंत्र शाखेचे प्रा.किशोर महाजन यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. यात औद्योगिक सहलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Protected Content