जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पाळधी येथील युवा नेतृत्व विश्वजित मनोहर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ही नियुक्ती केली.
यावेळी विश्वजित पाटील यांना नियुक्तीपत्र देताना आ.जयंत पाटील, आ.एकनाथ खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, प्रदेश उपाध्यक्ष ललित बागुल, आणि प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील हे उपस्थित होते.
युवकांचे प्रश्न सोडवून पक्ष बळकट करणार – विश्वजित पाटील
यावेळी बोलताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील यांनी सांगितले की, “खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहोचवण्याचे कार्य करणार आहे. पक्षाला बळकटी देऊन पक्ष वाढवण्याचे काम करणार आहे, तसेच युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्य युवकांच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार आहे.”
विश्वजित पाटील यांच्या नियुक्तीबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ॲड. रविंद्र पाटील, माजी आमदार राजु देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी आमदार अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप खोडपे, दिगंबर पाटील, राजेंद्र चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विश्वजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.