यावलकरांना दिलासा: नालेसफाईच्या कामाला वेग!


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी कदीर खान यांच्या मागणीनुसार अखेर यावल नगरपरिषद प्रशासनाने शहरातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून यावल शहरातील विस्तारित वसाहतींमधील नाल्यांची स्वच्छता झाली नव्हती. जून महिना संपला तरी नगरपरिषदेकडून या कामाकडे दुर्लक्ष केले जात होते. यामुळे पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी पसरत होती, ज्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते आणि आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

या गंभीर समस्येकडे कदीर खान यांनी ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’च्या माध्यमातून यावल नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. त्यांनी नगरपरिषदेला तातडीने नालेसफाई करण्याची मागणी केली होती. कदीर खान यांच्या मागणीची आणि ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’मधील वृत्ताची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली.

यामुळे नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत, तसेच कदीर खान यांच्या दूरदृष्टीचे आणि जनसेवेच्या कार्याचे कौतुक केले आहे. कदीर खान यांच्या पाठपुराव्यामुळेच ही समस्या मार्गी लागली, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. या नालेसफाईमुळे आगामी काळात पावसाळ्यातील अनेक अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.