मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नगर विकास दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात रचना सहायक अधिकारी विशाल नवले यांना स्वराज अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकाराने सन्मानीत करण्यात आले.
या संदर्भातील वृत्त असे की, नगरविकास दिनानिमित्त दिनांक २४ रोजी मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात रचना सहायक अधिकारी विशाल नवले यांना स्वराज अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकाराने सन्मानीत करण्यात आले. नवले यांनी केलेल्या कामाचा यातून यथोचित गौरव करण्यात आला आहे. त्यांनी आधी जळगाव येथे कार्य केलेले आहे.