Home धर्म-समाज किनगाव येथे उद्या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

किनगाव येथे उद्या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे उद्या बुधवार, दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनास हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सदर संमेलनाचे आयोजन स्टेट बँकेच्या मागील बाजूस, बाजीराव नगर, किनगाव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून भटके विमुक्त विकास परिषद, देवगिरी प्रांत कार्यकारणी सदस्य विकास विठ्ठल लोहार (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) उपस्थित राहणार आहेत.

तसेच आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुल, चिंचोली (ता. यावल) चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. योगीराज रोहिदास सपकाळे आणि स्वामीनारायण मंदिर, मालोद येथील पूज्य प्रेमप्रकाश दासजी महाराज यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

या विराट हिंदू संमेलनास यावल तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, किनगाव परिसर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound