विराटही बॅाटल कॅप चॅलेंजमध्ये सामील

virat

नवी दिल्ली प्रतिनिधी । सध्या सोशल मीडियावर बॅाटल कॅप चॅलेंजचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील सामील झाला असून त्याने सोशल मीडियावर 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करुन हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

याबाबत माहिती अशी की, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसह शिखर धवनने देखील हे चॅलेंज पूर्ण केले होते. क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहलीला रिव्हर्स शॉट्स खेळतांना फारच कमी वेळा दिसून येतो, मात्र विराटने रिव्हर्स शॉट खेळत बॅाटल कॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा समालोचक करतानाचा आवाज देखील या व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे.

Protected Content