सफरचंद उत्पादनाचा आखतवाडे येथील व्हायरल इमेज खोटी : माजी सरपंचाचा खुलासा (व्हिडिओ)

पाचोरा, नंदू शेलकर । तालुक्यातील आखातवाडे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सफरचंदाचे भरघोस उत्पन्न होत असल्याची इमेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो बनावट आहे. आमच्या गावात एकही शेतकरी सफरचंदाची लागवड करत नाही अशी माहिती माजी संजय परदेशी यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर आखतवाडे ता. पाचोरा येथील प्रयोगशील शेतकरी पंडित नेवबा हयाळीज यांनी त्यांचे शेतात सफरचंदाचे भरघोस उत्पन्न घेत असल्याची इमेज व्हायरल होत आहे. याबाबत आखतवाडे येथे प्रत्यक्ष जावून सत्य बाजू जाणून घेतली असता ही बातमी खोटी असल्याची माहिती माजी सरपंच संजय परदेशी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सोशल मिडियावर व्हायरल झालेली ती इमेज बनावट असून आमच्या गावात एकही शेतकरी सफरचंदाची लागवड करत नाही. तसेच सदरच्या इमेजमध्ये दाखविण्यात आलेली व्यक्ती आमच्या गावातील नाही. तसेच पंडित नेवबा हयाळीज या नावाची व्यक्ती देखील नाही. कोणीही या व्हायरल झालेल्या इमेजवर विश्वास ठेवु नये. सफरचंद या पिकाला थंड हवामान आवश्यक असते. जळगाव जिल्ह्याचे तापमान जास्त असल्याने अशा तापमानात सफरचंद शेती करणे शक्यच नाही असेही यावेळी संजय परदेशी यांनी स्पष्ट केले. सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या इमेज व व्हिडीओची शहानिशा करुनच निर्णय घ्यावा, व्हायरल होणारे व्हिडीओ व इमेजेस मध्ये १०० टक्के सत्यता असेलच असे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content