पाचोरा तालुक्यात ‘कही खुशी कही गम’ ; ५० गावात बनणार महिला कारभारी

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी २८ जानेवारी रोजी दोन टप्प्यांत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती साठी – ४, अनूसुचिच जमातीसाठी – १०, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी – २७ तर खुल्या प्रवर्गासाठी – ५६ जागांचे आरक्षण जाहीर झाले. 

निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर झाल्याने ज्या गावात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी आणि त्यातल्या त्यात ५० टक्के जागांसाठी महिलांचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. काहींनी निवडणुकीत पैसा खर्च करून ही मनासारखे आरक्षण न निघाल्याने त्यांचेवर पश्च्यातापाची वेळ येवुन ठेपली आहे.

तालुक्यात अनुसुचित जातीच्या ७ जागांपैकी नाचणखेडा, बदरखे, कोल्हे व गाळण बु” येथे महिला राखीव, अनुसुचित जमातीच्या १० जागांपैकी बांबरुड (राणीचे), निंभोरी बु”, वडगांव कडे, सारोळा बु” व दहिगांव या ५ गावांसाठी महिला राखीव जाहीर झालेल्या असुन सारोळा बु” येथे अनुसूचित जमातीचा उमेदवार नसल्याने रिक्त जागेवर पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. तर निंभोरी बु” येथे अनुसूचित जमातीसाठी स्री राखीव जागा नसल्याने त्या जागी पुरुषाला संधी दिली जाणार आहे.

नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायतीत महिला राज

पाचोरा तालुक्यात २७ पैकी १३ नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २७ जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्यापैकी लोहटार, गोराडखेडा बु”, कुऱ्हाड खु”, आसनखेडा बु”, माहेजी, वरसाडे प्र. पा., अंतुर्ली बु”, प्र. पा., डांभुर्णी, तारखेडा खु”, वाडी, बाळद व ओझर अशा १३ गावांमध्ये महिलांसाठी आरक्षण निघाले आहे.

२८ गावात सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण

तालुक्यातील ५६ सर्वसाधारण जागांपैकी २८ गावात महिलांसाठी राखीव निघाले असुन यात चिंचपुरे, पिंपळगांव हरे., डोकलखेडा, कुरंगी, लासुरे, मोहाडी, मोंढाळे, नांद्रा, निपाणे, वडगांव बु” प्र. पा., वडगांव खु” प्र. भ., वडगाव मुलाने, विष्णुनगर, वडगांव आंबे, आखतवाडे, अंतुर्ली खु” प्र. लो., अंतुर्ली खु” प्र. पा., बांबरुड प्र. पा., बिल्दी, डोंगरगांव, हनुमानवाडी, पहान, पुनगाव, सारोळा खु”, सार्वे बु” प्र. भ., सार्वे बु” प्र. लो., सावखेडा बु” व सावखेडा खु” या २८ गावात सर्वसाधारण महिला सरपंच पदावर विराजमान होणार आहे.

 आरक्षण काढण्याकामी गट विकास अधिकारी अतुल पाटील, निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, नायब तहसिलदार बी. डी. पाटील, अजिंक्य आंढळे, भरत पाटील, राजकुमार धस, दिलीप सुरवाडे, सुनिल पाटील, यांनी सहकार्य केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य शालिग्राम मालकर, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, ज्ञानेश्वर सोनार, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, प्रा. भागवत महालपुरे, अक्षयकुमार जैस्वाल, बाजार समितीचे संचालक नरेंद्र पाटील, शिवदास पाटील, अविनाश देशमुख, अमृत चौधरी, जयसिंग परदेशी, अभिमन पाटील, रामधन परदेशी,  सचिन सोमवंशी, गोरख पाटील, रवि गिते, कैलास भगत यांचेसह मोठ्या संख्येने विविध पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सारोळा बु” येथे निघाले निवडणूक न झालेल्या जागेचे आरक्षण

सारोळा बु” तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायतीत ७ सदस्य संख्या असुन या ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीची एक जागा राखीव असुन निवडणुकीत या जागेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही जागा रिक्त राहिली होती. व उर्वरित ६ जागा माघारीच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या. मात्र सरपंच पदाच्या आरक्षणाच्या दिवशी या गावात लोकसंख्येनुसार ही जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाली आहे. मात्र या प्रवर्गातील उमेदवार निवडून आलेला नसल्याने येथील अविनाश देशमुख यांनी या घटनात्मक पेचाबाबत तहसिलदार कैलास चावडे यांचेशी संपर्क साधला असता चावडे यांनी सांगितले की, याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करणार असुन कदाचीत ६ महिन्यांनंतर एका जागेसाठी पुन्हा निवडणूक होऊ शकते. तोपर्यंत सारोळा बु” ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होईल.

बांबरुड (राणीचे) येथे वाघ कुटुंबियांचे ३५ वर्षांची सत्ता संपुष्टात

बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथे गेल्या ३५ वर्षांपासून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या कुटुंबीयांच्या घराण्यात ३५ वर्षांपासून सरपंचपद आहे. यावर्षीही वाघांच्या पॅनलला १५ पैकी ११ जागा मिळुन स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसुचित जमाती (एस. टी.)साठी आरक्षण निघाल्याने वाघ घराण्याची सरपंच पदाची सत्ता गेली असली तरी अनुसुचित जमाती प्रवर्गातुन निवडुन आलेला उमेदवार हा वाघ कुटुंबियांच्या पॅनलचाच असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार वाघांकडेच राहील.

Protected Content