बकालेला व्हिआयपी वागणूक; चौकशी करून कारवाईची मागणी

सकल मराठा समाजाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांना निवेदन

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटकेनंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीची निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर बकाले हा १५ महिन्यांपासून फरार झाला होता, काही दिवसांपूर्वी बकाके हा पोलिसांना शरण आला. त्यामुळे त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या कालावधीमध्ये बकाले याला व्हीआयपी वागणूक देवून पोलीसांच्या संशयास्पद भूमिका दिसून येते. अशा संदर्भाचे वृत्त वर्तमानपत्रात छापून आले होते. दरम्यान बकलेला व्हीआयपी वागणूक देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता देण्यात आले. याप्रसंगी मराठा समाजाचे मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content