मुक्ताईनगरात लॉकडाउन नियमांचे उल्लंघन : दोन व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी । दोन आठवड्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव हा चिंताजनक आहे. याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन परिपत्रक काढून काही बंधने घातलेली आहे. मात्र याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असून मुक्ताईनगर शहरातील दोन व्यावसायिकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. 

दरम्यान, ही घटना दिनांक दोन मार्च 2019 रोजी घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भारत बूट हाऊसचे मालक शेख परवेज शेख निसार व महावीर ऑटो पार्ट्स चे मालक महावीर दिलीप चांद बोथरा यांनी व्यवसाय करताना आस्थापना सुरू असताना विना मास्क राहून सामाजिक आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य केल्याचे नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत आढळून आले. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरा व मास्कचा वापर करा अशा सूचना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना दिल्या मात्र आम्ही दंड भरणार नाही व मास्क वापरणार नाही असे दोघे व्यावसायिकांनी पवित्रा घेतला या प्रकरणी सामाजिक आरोग्य धोक्यात येईल असे कृत्य करणे दंड भरण्यास नकार देणे जिल्हाधिकारी क्र दंडप्र-01कावि/571/2021दि17/03/2021 व क्र दंडप्र 01 कावि/583दि.01/03/2021 या आदेशांचे उल्लंघन केल्याची फिर्याद नगर पंचायत कर्मचारी गणेश प्रल्‍हाद कोळी यांनी दिल्याने भारत बूट हाऊस चे मालक शेख परवेज शेख निसार व महावीर ऑटो पार्ट चे महावीर चंद्र बोथरा अशा दोघे व्यवसायिकांनी विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content