दुचाकीला लावलेली कागदपत्रांसह ५० हजारांची रोकडची पिशवी लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कचेरी समोर दुचाकीला लावलेली ५० हजार रूपये ठेवलेल्या रोकडची पिशवी आणि महत्वाची कागदपत्रे ग्रामसेवक जितेंद्र पाटील यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, विजय कैलास पाटील वय २९ रा. लोंढवे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बांधकाम ठेकेदारीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ मार्च रोजी विजय पाटील हे अमळनेर शहरातील कचेरी समोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएच ८५२९)ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकीच्या हॅन्डलला ५० हजार रूपये आणि महत्वाची कागदपत्रे ठेवलेली पिशवी लटकवलेली होती. त्यावेळी ग्रामसेवक जितेंद्र विनायक पाटील रा. नगाव ता. अमळनेर याने पिशवी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौकशी अंती अखेर बुधवारी २० मार्च रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली .त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेद्र पाटील याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content