Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा ‘मिस फायर’ ; गोळी लागून तरुणाचा मृत्यू 

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा ‘मिस फायर’ ; गोळी लागून तरुणाचा मृत्यू 

0
156


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गावठी कट्टा हाताळताना अचानक सुटलेल्या गोळीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अरुण महाजन या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरात मंडप व्यवसाय करणारा अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन याने त्याच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. बंदूक हाताळताना अचानक ‘मिस फायर’ होऊन गोळी थेट अरुणच्या छातीत जाऊन लागली.

गोळी लागल्यानंतर अरुण महाजन गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी भूषण महाजन याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या जवळ गावठी कट्टा कसा आला, तो कुठून मिळवला, तसेच घटनेच्या वेळी मित्रांमध्ये काही वाद झाले होते का, या सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे अमळनेर शहरात बेकायदेशीर शस्त्रांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या शस्त्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound