एमआयडीसी परिसरातून गावठी पिस्तुलासह एका अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील एमआयडीसी परिसरातील सद्गुरु इंडस्ट्रीज परिसरात गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अटक केली असून त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एमआयडीसी भागातील सद्गुरु इंडस्ट्रीज परिसरामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार हरीश राहुल उजलेकर रा. वरणगाव ता. भुसावळ हा आपल्या हातात गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार हरीश उजलेकर याला अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काढतोस असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, महेश चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, जावेद शहा यांनी केली आहे.

Protected Content