भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची घटना शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गावात राहणारा पवन चौधरी याने तिला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन पवन चौधरी यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी पवन चौधरी यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहे.