ओझर येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त; चार जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओझर शिवारात गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर शहर पोलीसांनी धाड टाकून सुमारे ८४ हजार रूपयांची मुद्देमालाचे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ओझर शिवारात एकूण ४ ठिकाणी गावठी दारूची हातभट्टी तयार होत असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मिळाली.  तत्काळ पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि सचिन कापडने, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील, अभिमान पाटील, पंढरीनाथ पवार, प्रविण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतिष राजपूत, भगवान माळी आदींनी छापा टाकून एकूण चार ठिकाणावरून 200 लिटर उकळते रसायन, 2 हजार 625 लिटर कच्चे रसायन, 770 लिटर गावठी दारू असा एकुण 84 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच उद्ध्वस्त करण्यात आले. यावेळी एकूण चार जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले. सदर ठिकाणी शोभाबाई रोहिदास बोरसे, गोपाल रमेश सोनवणे, धर्मराज भिका गायकवाड व कमलाबाई भुरा दळवी सर्व रा‌. ओझर ता‌. चाळीसगाव यांचे अनुक्रमे १५ हजार ७००, १५ हजार  २५०, २८ हजार ८०० आणि  २४ हजार ४०० मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास विनोद भोई व धर्मराज पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content