मे महिन्यात 9 दिवस बँका बंद

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । नवीन आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्‍या महिन्यात ‘मे’ मध्ये खासगी आणि सार्वजनिक बँका एकूण 9 दिवस बंद राहणार आहेत.

 

बँकांच्या विविध सुट्यांमुळे 5 दिवस बँका बंद राहतील. सुट्टीशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडल्यास मे 2021 मध्ये बँका एकूण 9 दिवस बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वेबसाइटनुसार मे 2021 मध्ये बँक महाराष्ट्र दिन, रमजान, बुद्ध पौर्णिमा अशा विविध उत्सवांमुळे बंद असणार आहेत.

 

देशामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे बँकांमध्ये काम करण्याची पध्दतही बदलेली आहे. कोरोना झोनमध्ये असलेल्या बँकांच्या कर्मचार्‍यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सुविधा मर्यादित केल्या आहेत. यासह अनेक राज्यांतील बँकांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान 15 मे पर्यंत बँका सुरू असतील. सायंकाळी चार वाजता बँका बंद ठेवल्या जातील.

 

 

1 मे कामगार दिनबँका बंद राहतील. या दिवशी बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोची, कोलकत्ता, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे बँका बंद असतील. 7 मे – umat-ul-Vida च्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँक बंद राहतील. 13 मे या दिवशी ईद (ईद-उल-फितर) आहे. बेलापूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथे बँक बंद राहतील.14 मे  भगवान परशुराम जयंती, रमजान-ईद, बसवा जयंती आणि अक्षय तृतीया यामुळे आगरतळा, अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक. गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाल, जयपूर, कानपूर, कोलकत्ता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटना, पणजी, रायपूर, रांची, शिलांग आणि शिमला येथील बँक बंद राहतील.26 मे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका बंद असतील.रविवारी व्यतिरिक्त दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवार आहे, तर 8 आणि 22 मे रोजी दुसरा आणि चौथा शनिवारमुळे  बंद असतील.

Protected Content