शेंदूर्णी प्रतिनिधी । येथिल दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार विलास अहिरे यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय व भ्रष्टाचार निवारण समितीचे जामनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले असून संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष डी.व्ही.गवई यांचे आदेशानुसार जळगांव जिल्हाध्यक्ष मुकेश गोसावी यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
नियुक्ती पत्रात समितीच्या उद्देशानुसार संघटनेचा जनकल्याणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन समाजाला भेडसावणाऱ्या व वेगाने फैलावत असलेल्या अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध जामनेर तालुक्यात मोहीम उघडून समाजातील घटकांना जागृत करून अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ही जबाबदारी समितीकडून देण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.जामनेर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्तीचे सर्व स्तरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे लवकरच संघटनेचे जामनेर शहर अध्यक्ष व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे विलास अहिरे यांनी कळविले आहे.



