यावल प्रतिनिधी । तालुक्यातील उटांवद येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विकास पाटील तर उपाध्यक्ष पदी किशोर सपकाळे यांनी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष पदी विकास पाटील उपाध्यक्षपदी किशोर सपकाळे पालक सदस्य म्हणून मंजुळाबाई भिल स्था.प्र.सदस्य पदी उपसरपंच भावना पाटील तर योगेश पाटील, निंबा कोळी,आक्काबाई भिल, सविता सपकाळे, समाधान पाटील, भगवान भरवाड, सुचिता पाटील, शिक्षक सदस्य अनिल पाटील, शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून पुरूषोत्तम महाजन तर सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच छोटु भिल, उपसरपंच भावना पाटील, ग्राम पंचायत सदस्य डिगंबर सपकाळे, तंटामुक्त गाव समीती अध्यक्ष रामचंन्द्र सपकाळे, उप शिक्षक सुनिल बावीस्कर, मनोज येवले सह ईतर ग्रामस्थ मंडळी उपस्थीत होती.