वनसंरक्षणाकरीता वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सराव प्रशिक्षण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वनसंरक्षणाकरीता यावल वनविभाग जळगांव मधील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे. याआधी खुप वर्षापुर्वी यावल वनविभागात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

सदर शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण हे पोलीस प्रशिक्षण केंद्र जळगांव येथे आयोजीत करण्यांत आले होते. सदर प्रशिक्षण हे यावल वनविभाग मधील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणा करीता देण्यात आलेले आहे. ५ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान राखीव पोलीस निरिक्षक, पोलीस मुख्यालय जळगांव यांचे मार्फत शारीरीक कवायत (P. T), ड्रिल, शस्त्र कवायत (ड्रिल) तसेच शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण त्यामध्ये ७.६२mm SLR व ९mm पिस्टल यांचे खोलना-जोडना, अॅम्युनिशन भरना – खाली करना, वेगवेगळे फायर पोझीशन सोबत फायर करना इत्यादी प्रकारचे सराव यावल वनविभागातील वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांचे कडून करुन घेण्यात आले आहे.

शस्त्र हाताळणे व सरावाचे प्रशिक्षण देण्यांत आलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना २४ ते २६ फेब्रुवारी रोजी फायरिंग रेंजवर फायरिंग बाबत प्रशिक्षण देखील देण्यात आले. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना वनसंरक्षणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. राखीव वनात अपप्रवेश करुन सोबत शस्त्र घेवून अवैध वृक्षतोड, अतिक्रमण व अवैध शिकार करण्यासाठी जे अज्ञात इसम जंगलात त्यांना अटकाव करण्यासाठी तसेच त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे प्रशिक्षण देण्यात आले.

Protected Content