पाचोरा, प्रतिनिधी | पाच रुपयांचे नाणे गिळलेल्या ११ वर्षांच्या मुलावर तात्काळ शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे.
याबाबत वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बालक रोहित शिवाजी राऊत ( वय ११ ) याने खेळत असतांना पाच रूपयांचे नाणे गिळले. हे नाणे गिळले होते. हे नाणे जठरात जाऊन अडकल्यामुळे त्याचे प्राण धोक्यात आले होते. अखेरचा पर्याय म्हणून त्याच्या कुटुंबातील नागरिकांनी मुलास पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या वेळी विघ्नहर्ता मध्ये अपोलो हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध गॅस्ट्रोइंटरॉलॉजिस्ट तथा, लिव्हर स्पेशालिस्ट व एन्डोस्कोपिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी भूलतज्ञ डॉ. सागर गरुड व असिस्टंट माने यांच्या सहकार्याने एंडोस्कोपी करण्यात आली. यामुळे त्या बालकाचे प्राण वाचले. डॉ सागर गरुड डॉ भूषण मगर डॉ शरद देशमुख यांनी इंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. डॉ सागर गरुड यांच्या मदतीने डॉ. भूषण मगर आणि इंडोस्कोपी विभागातील कर्मचारी यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर ही अवघड इंडोस्कोपी यशस्वी केली. बालकाच्या कुटूंबानी व नातेवाईक यांनी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे आभार मानले आहेत.