विद्यार्थी साहित्य संमेलन लांबणीवर

NMU 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व मूळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व कुलगुरु यांच्या परवानगीने पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन एम.जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. ११ ते 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते. मात्र संततधार पावसामुळे विद्यार्थी साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, या भागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई, या जिल्हयांमध्ये संततधार पाऊसामुळे नदया नाल्यांना पूर येऊन या पूराने भयानक आणि भैसूर रौद्ररुप धारण केले आहे. यामुळे येथील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रभर जल प्रलयामुळे आपत्ती निर्माण झाली आहे. याचाच विचार करत, मानवतेच्या भावनेतून व जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयांमध्ये गेल्या 4  दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार नुसार, या जिल्हयामध्ये दि.०८ ते १२ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात
येत असून साहित्य संमेलन आयोजन कालावधीबाबत लवकरच कळविण्यात येणार आहे.

Protected Content