भुसावळातील नहाटा महाविद्यालयात ‘टर्निंग पॉईंट’ लघुपटाचे चित्रीकरण

nahata clg

भुसावळ प्रतिनिधी । येथील पु. ओ. नहाटा महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमात नुकताच नाट्यशास्त्र विभागाचा समावेश करण्यात आला आहे. नाट्यशास्त्र विभाग चित्रपट निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘टर्निंग पॉईंट’ या लघुपटाचे चित्रीकरण करण्यासाठी प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी देखील परवानगी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते प्यायल्यावर मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहत नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची दिशा आणि दशा तो घेत असलेलं शिक्षण ठरवत असते. त्यात शिक्षकांची भुमिका महत्‍वाची असते. एक आदर्श शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवू शकतो. हाच विषय घेऊन तरूणांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात वेळेचे आणि शिक्षणाचे महत्व सांगण्याकरीता ह्या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. महाविद्यालयात भरपूर विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांना त्यांचे शिक्षक शिक्षणासोबत बाळकडू ही देत असतात.

पु.ओ.नहाटा नाट्यशास्त्र विभाग व ड्रामा लॅब चित्रपट निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रीकरण करण्यात आले आहे. टर्निंग पॉइंटचे छायांकन तन्मय रासकर(पुणे), संवाद-पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अतुल चौधरी, सहाय्‍यक दिग्दर्शक प्रणव भिसे (पुणे), साऊंड रेकॉर्डिंग गौरव शर्मा, लाईट्स बोधीसागर तायडेसह अभिर एरखे, लोकेशन व्यवस्थापन कुंदन तावडे, कलाकार समन्वयक उमेश गोर्धे, सतीश कुलकर्णी, वैभव मावळे आणि अभिजित यांचे मार्गदर्शन आहे. संस्थाध्यक्ष डॉ. मोहन, सचिव विष्णु चौधरी व प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे यांनी पु.ओ.नहाटा महाविद्यालयात लघुपटाच्या चित्रीकरणाची परवानगी दिली.

संदीप पाटील (अध्यक्ष: अंतर्नाद प्रतिष्ठान), रचना महाजन, आशिष चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले. वैष्णवी पाटील, शुभम झोपे, आम्रपाली मेढे, बुद्धभुषण अहिरे, स्वप्नील ननावरे, सोनल पगारे, मयुरी भोंदे, ऐश्वर्या वासकर, वैष्णवी चौधरी, पल्लवी सोनार, पंकज कोळी, लीना नारखेडे यांनी विद्यार्थ्यांची भूमिका केलेली आहे. अतुल दिलीपसिंग चौधरी हा नाट्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी असून त्याने महाविद्यालयात असतांना अनेक नाटक व एकांकिकांमध्ये भूमिका केली आहे. आता तो चित्रपट निर्मितीकडे वळला असून लवकरच आपल्याला ‘टुर्निंग पॉईंट’ हा लघुपट त्याच्या ‘ड्रामा लॅब फिल्म्स’ ह्या युट्युब चॅनेलवर बघायला मिळणार आहे. याआधी त्याने ‘अमीगो’ ह्या लघुपटातून समाजात जनजागृती केली होती.

Protected Content