लँडर ‘विक्रम’ची कक्षा लहान करण्यात यश

vikram

बेंगळुरू, वृत्तसंस्था | महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या मोहिमेअंतर्गत चांद्रयानापासून विलग झालेल्या ‘विक्रम’ या लँडरची कक्षा मंग‌ळवारी प्रथमच यशस्वीरित्या कमी करण्यात आली. त्यामुळे हे लँडर चंद्रावर उतरण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. शनिवारी पहाटे हे लँडर चांद्रभूमीवर उतरणार आहे.

 

चांद्रभूमीवर उतरवण्यात येणाऱ्या विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हरला मुख्य ‘चांद्रयान-२’ पासून विलग करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला सोमवारी यश आले होते. त्यानंतर कक्षा कमी करण्याची चार सेकंदांची कारवाई करण्यात आली आहे.

Protected Content