केसीईच्या प.वि.पाटील विद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईच्या प.वि.पाटील विद्यालयात रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मराठा भाषा दिवस निमित्त ‘गोष्ट माझ्या भाषेत’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलते केले.

 

 

इंग्रजी माध्यम असो की मराठी माध्यम ‘ आज कोणत्याही शाळेत शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला जातो, पण गेल्या 2 वर्षापासून मुलांचा शाळेतील संवाद जवळजवळ संपतच आला होता मुलांची मराठी विषयाची भीती नाहिशी व्हावी व मातृभाषेविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी के सीई सोसायटी संचालित गुरुवर्य प वि. पाटील विद्यालयात मराठी भाषा दिवसाच्या निमिलाने पहिली ते दुसरीच्या गटातून माझी गोष्ट माझ्या भाषेत या कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्याना बोलते करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला.

 

त्यात पहिल्या गटातून आरुशी अदमाने , खुशी पाटील ‘निरज आहिरे ‘ देविका राजपूत ‘ सोहन इंगळे , रुचिता पाटील तर दुसऱ्या गटातून स्वताच्या भाषेत कथा सांगणे यात खुशी भूषण ‘ मानवी पाटील ‘ शाश्वत कुलकर्णी  ‘ केतन पाटील ‘ उत्कर्षा नारखेडे रुद्राक्ष दुसाने हे विद्यार्थी बक्षिसपात्र ठरले त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी शालोपयोगी वस्तू देऊन अभिनंदन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content