अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांसाठी नवीन वीज धोरणाचे संकेत

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांसाठी नवीन वीज धोरणाचे संकेत उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणाला मंत्रालयातील बैठकीत दिले आहेत.

 

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वैयक्तिक औद्योगिक घटक व औद्योगिक सहकारी संस्था यांच्यासाठी वीज दरात सवलत, पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी धोरण ठरविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांचा महासंघ यांच्यासोबत नुकतीच मंत्रालयात या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाचे कार्याध्यक्ष मोहन माने, उपाध्यक्ष प्रमोद कदम व सचिव गौतम गवई उपस्थित होते. येत्या १० दिवसात मागासवर्गीय उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरण प्रस्तावित करण्याचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची व्याप्ती वाढवून त्यात औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचा समावेश करण्याचे निर्देश यावेळी डॉ.राऊत यांनी दिले.

Protected Content